Ladaki Bahin Yojana : तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का मग तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. लाडक्या बहिणींना महापालिका निवडणुकीच्या आधी डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता.
त्याआधी लाडक्या बहिणींना नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला. वास्तविक, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकारने डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येतील अशी घोषणा केली होती.

पण महापालिका निवडणुकीच्या आधी फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेत. कारण की राज्यात आचारसंहिता सुरू होती. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने लाडक्या बहिणीना ऍडव्हान्स देण्यास बंदी केली होती.
मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान !
लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. पाच फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान पार असेल.
या पार्श्वभूमीवर आता फडणवीस सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. जानेवारीचा हप्ता 5 फेब्रुवारी आधीच पात्र महिलांना मिळणार अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.
CM फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीचा हप्ता देऊ अशी ग्वाही दिली होती. यामुळे, आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना 1500 मिळण्याची शक्यता आहे.
येत्या 20 दिवसात निघणार शासन आदेश
अद्याप सरकारने हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण ZP मतदानाच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील 18 – 20 दिवसांच्या काळात जानेवारी महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.













