Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्याचे दोन हजार रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आले आहेत. अशातच, आता या योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे.
काय आहे नवीन अपडेट
जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे.
राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होतोय. तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडसर ठरत नसल्याचे सांगितले आहे.
यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबर चा हप्ता जमा झाला नाही तर निवडणूक का संपल्यानंतर या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात एकाच वेळी जमा होतील.
दोन आणि तीन डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अर्थात पुढील महिन्यात एकाच वेळी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीत जर महिलांनी केवायसी केली नाही तर त्यांना योजनेतून बाहेर केले जाईल असा सुद्धा दावा केला जातोय. त्यामुळे मुदतीत महिलांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना योजनेच्या बाहेर ठेवली जाऊ शकते.
नक्कीच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता सोबतच मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याने या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी हे डबल गिफ्ट ठरू शकते.













