Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर याअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत.
नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे १३ दिवस उलटले असले तरी अद्याप एकही हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, आता या योजनेबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे. म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यात थेट ₹३००० जमा होऊ शकतात.
शासनाकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता असून पुढील ७ दिवसांत, म्हणजेच २१ डिसेंबरपूर्वी पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, २० डिसेंबर रोजी राज्यातील २० नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांची सखोल तपासणी सुरू असून दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरत आहेत. अशा अपात्र महिलांना नोव्हेंबर–डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही.
तसेच, लाडकी बहीण योजनेत केवायसी (KYC) करण्यासाठी आता केवळ १७ दिवस शिल्लक राहिले आहेत. केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे.
वेळेत केवायसी न केल्यास महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
एकूणच, लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर–डिसेंबर हप्त्याबाबत लवकरच सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता असून महिलांच्या खात्यात ₹३००० जमा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













