Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज पासून काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. 9 डिसेंबर 2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये पंधराशे रुपये क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नाही तर मध्य प्रदेश मधील लाडक्या बहिणींना आजपासून पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे. यामुळे मध्य प्रदेशातील महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला आहे.

राज्य सरकारने लाडली बहना योजनेअंतर्गत 31व्या हप्त्याचे वितरण आज, 9 डिसेंबर 2025 पासून सुरू केले असून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी आजपासून आपल्या बँक खात्यांची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः सीएम मोहन यादव यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.
ख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत याबाबत अपडेट दिले आहे. त्यांनी 31वा हप्ता वितरित झाल्याची माहिती स्वतः दिली. त्यांनी लिहिले, लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यातील 31व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले आहे.
9 डिसेंबर रोजी योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर राज्यभरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील एकूण 1.26 कोटी महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
लाडली बहना योजनेच्या निधीमध्ये सरकारने अलीकडेच वाढ केली आहे. राज्य सरकारने या योजनेचा निधी 1250 रुपयांवरून पंधराशे रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
अर्थातच आता दरमहिन्याला लाभार्थी महिलांना 250 रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. वाढीव निधीमुळे आर्थिक सक्षमीकरणाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत एमपीमधील लाडक्या बहिणींना 30 हप्ते मिळाले आहेत. दरम्यान आता या योजनेचा 31 वा हप्ता आज पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.













