हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिन्याची ओवाळणी मिळणार का ? CM फडणवीस यांनी दिली अपडेट

Published on -

Ladaki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला सुरू होऊन एका वर्षाचा काळ झाला आहे मात्र ही योजना पाहता-पाहता अवघ्या काही दिवसांमध्येच लोकप्रिय झाली. खरे तर ही योजना महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेश मध्ये ही ठरली होती आणि त्याच धर्तीवर राज्यात योजना सुरू झाली आणि महाराष्ट्रात सुद्धा ही योजना हिट राहिली आहे.

या योजनेच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आलेले नसतानाही विधानसभा निवडणुकीत मोठा उलट फिर आपल्याला पाहायला मिळाला आणि महायुतीला जबरदस्त बहुमताने आपल सरकार स्थापन करता आले.

विशेष म्हणजे या योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुद्धा सुरू असतात. सरकार देखील अशा चर्चा सातत्याने सुरू ठेवते. ही योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा काळ होता आणि योजना सुरू करताना सरकारने भविष्यात या योजनेतून पात्र ठरणाऱ्यांना 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली.

सध्या या योजनेतून पात्र ठरणाऱ्यांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळतोय. आता महायुतीचे सरकार स्थापित होऊन बरेच दिवस झाले आहेत, पण तरीही 2100 रुपये प्रति महिना बाबत योग्य तो निर्णय झालेला नाही आणि यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे,

ज्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळू शकतो विशेषता महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला दिसेल असे काही राजकीय तज्ञांचे मत आहे.

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार काही मोठा निर्णय घेणार का? हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना एक विषय रुपयांचा लाभ मिळणार का असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अपडेट दिली आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना सन्मान निधी रक्कम 2100 रुपये प्रतिमहिना करण्याचे आश्वासन दिले होते.

पण सत्तेत आल्यानंतरही अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे महिला वर्गात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळत असून सरकारांची फसवणूक करत असल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतय.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

शेतकरी संकट, महिला सुरक्षा आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले. याच कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार करत त्यांच्या पत्रकार परिषदेला “निराशेने भरलेली” अशी टीका केली.

सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. याच दरम्यान एका पत्रकाराने लाडकी बहीण योजनेतील वाढीव निधीबाबत प्रश्न उपस्थित केला. महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वाढीच्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होणार, असे विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.

काळजी करू नका.” त्यांच्या या उत्तराने महिलांना तातडीने वाढीव मदत मिळण्याची शक्यता क्षीण झाली असून, सध्या तरी 1500 रुपयांचे विद्यमान अनुदानच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, फडणवीसांच्या या विधानामुळे भविष्यात या योजनेत वाढ होण्याची आशा कायम आहे.

थोडक्यात हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना ओवाळणी मिळणार नसल्याचे क्लियर झाले आहे. परंतु आगामी काळात जेव्हा विधानसभा किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येतील तेव्हा या संदर्भात नक्कीच सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News