लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली नवीन अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात एकाच वेळी देण्यात आला होता. दरम्यान, आता या योजनेच्या पुढील एप्रिल महिन्याबाबत एक नवीन अपडेट हाती येत आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे. या योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्यावर्षी सुरू झाली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या योजनेचा शुभारंभ केला.

या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना नऊ महिन्याचे 13 हजार 500 रुपये मिळाले आहेत. या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकाच वेळी देण्यात आला होता.

गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात 8 मार्च 2025 रोजी अर्थातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने या योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. दरम्यान आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय.

अशातच आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपण्यापूर्वीच मिळणार आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. खरे तर गेला काही दिवसांपासून मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.

दरम्यान आता आदिती तटकरे यांनी महिना संपण्याच्या आधीच एप्रिल महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार असे म्हटले असून यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना मिळू शकतो अशी शक्यता बळावली आहे.

महत्त्वाची बाब अशी की, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, ज्या महिलांचे कुटुंब उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच लाभ मिळतो, असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये मिळतात. दोन शासन निर्णयांच्या आधारे ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे, अशी सुद्धा माहिती दिलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या या योजनेचे 2 कोटी 47 लाख इतके लाभार्थी आहेत.

महत्त्वाची बाब अशी की, ऑक्टोबर 2024 मध्ये लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2 कोटी 33 लाख होती. दरम्यान आता ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून पात्र महिलांनाच लाभ दिला जात आहे, असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News