Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक च्या निवडणुका राज्यातील विविध पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांसाठी स्थानिक च्या निवडणुका आपापली ताकद दाखवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
खरे तर राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान घेतले. दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील 29 महापालिकांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर होईल अशी शक्यता आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार मोठा मास्टर स्ट्रोक लगावणार आहे. राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी फडणवीस सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी दोन हफ्ते दिल्या जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यात आता कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकांची घोषणा होणार अशी शक्यता आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकाचवेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार अशी माहिती समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात असून गेल्या महिन्यात पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत. दरम्यान आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतात अशी शक्यता आहे.
खरे तर नोव्हेंबर चा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग होणार अशी शक्यता होती मात्र अद्याप नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतेच हालचाल पाहायला मिळाले नसल्याने आता येत्या काही दिवसांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांना एकत्रितरीत्या दिले जाऊ शकतात अशी शक्यता बळावली आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून तशी तयारी सुरू असल्याची माहिती देखील काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. राज्यात 15 डिसेंबर नंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच लाडक्या बहिणींना दोन हप्ते दिले जातील अशा चर्चा आहेत.
म्हणजेच 15 डिसेंबर च्या आधी राज्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण अद्याप या संदर्भात सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे खरंच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
दुसरीकडे लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत केवायसी साठी मुदत देण्यात आली आहे. केवायसी केली नाही तर भविष्यात या योजनेचे पैसे थांबवले जातील अशी शक्यता आहे. यामुळे केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













