Ladki Bahin Yojana : जुलै महिना संपण्यास आता फक्त तीन-चार दिवसांचा काळ शिल्लक आहे आणि अजूनही लाडकी बहिण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच लाडक्या बहिणींना सरकारकडून गुड न्यूज दिली जाणार अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी देण्यात आला होता. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
जुलै 2024 ते जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या असून या योजनेचा तेरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येईल यासंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे.
कधी मिळणार जुलै महिन्याचा हफ्ता ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला. दरम्यान आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट 2025 च्या आधीच लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्याचे पैसे मिळतील अशी माहिती समोर आली आहे.
विशेष बाब अशी की ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे आणि यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित जमा होऊ शकतात असा सुद्धा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
खरे तर या योजनेची सुरुवात झाली त्यावेळी ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच देण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून तत्कालीन शिंदे सरकारने पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे एकाच वेळी दिले होते.
दरम्यान शिंदे सरकार प्रमाणेच फडणवीस सरकार देखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे रक्षाबंधनाचा पार्श्वभूमीवर एकत्रित देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
मात्र अजूनही या संदर्भात सरकारमधील मंत्र्यांकडून किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून लाडकी बहिण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार की फक्त जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.