Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली अन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर करण्यात आली. या अंतर्गत पात्र ठरणारे 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.
दरम्यान, आता याच योजनेच्या बाबतीत एक मोठे अपडेट हाती आलं आहे. खरंतर या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया काल म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून 30 एप्रिल 2025 रोजी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू असून आज महाराष्ट्र दिनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे.
म्हणजे येत्या काही काही तासांत लाभार्थींना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. एप्रिल चा हप्ता म्हणूनही पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. पण यातील काही महिलांना फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितल्यप्रमाणे, पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थींना 500 रुपये फरकाच्या स्वरूपात दिले जातात. म्हणजेच ज्या महिला पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत.
खरंतर लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 या सहा महिन्यांचा तसेच जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या तीन महिन्यांचा अशा तऱ्हेने एकूण नऊ महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत आतापर्यंत महिलांना 9 हप्त्यांमध्ये एकूण 13 हजार 500 रुपये मिळाले आहेत. आज एक मे 2025 सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्रातील मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून याच महाराष्ट्र दिनी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि आज एप्रिलचा हप्ता मिळाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत जमा होणारी रक्कम 15 हजार रुपये होणार आहे.
किती महिलांना मिळणार 500?
ज्या लाडक्या बहिणी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. खरेतर, लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या वर्षी दोन महत्त्वाचे जीआर निघाले होते. याच संदर्भातील शासनाच्या 28 जून व 3 जुलै 2024 रोजीच्या निर्णयानुसार, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जातात, तर जे लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांना फरकाची रक्कम मिळणार.
यानुसार आता एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून राज्यातील सुमारे 7.74 लाख महिलांना 500 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. मंडळी, या योजनेने महायुतीच्या निवडणूक विजयात मोलाचा वाटा उचलला आहे,
विधानसभेत या योजनेच्या जोरावर महायुतीने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. पण आता निवडणुकीनंतर दुसऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ कमी करण्यात आला असून यामुळे महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.