Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याजदरात एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. खरे तर सध्या स्थितीला लाडक्या बहिणी या योजनेच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 त्यांचे पैसे मिळाले आहेत या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि आता या योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होईल अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे.

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता महिना संपेपर्यंत मिळू शकतो. म्हणजेच जून महिन्याचा लाभ जून महिन्यातच मिळेल असे बोलले जात आहे तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जून महिन्याचा हप्ता या महिन्यातच मिळेल की जुलै महिन्याची वाट पहावी लागेल या साऱ्या गोष्टी येत्या काही दिवसांनी क्लियर होणार आहेत.
दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे म्हणजेच शून्य टक्के व्याजदरात लाडक्या बहिणींना एका लाखाचे कर्ज मिळणार आहे. पण याचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, नेमकी ही योजना काय आहे? याच संदर्भातील डिटेल माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
कोणाला मिळणार लाभ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्याला असणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना शून्य टक्के व्याजदरात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली असून या संदर्भात बोलताना दरेकर यांनी, राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या, छोट्या-मोठ्याव्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा होती.
हेच कारण आहे की, आता लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या चार प्रमुख महामंडळांच्या योजनांमधून लाभार्थींना चक्क बारा टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जात आहे.
यामध्ये पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यांचा समावेश आहे. पर्यटन महामंडळाच्या आई या योजनेतून 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे, ज्या महिला या योजनांमध्ये पात्र ठरतील, त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
मुंबई बँकेच्या माध्यमातून एका महिलेला 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. हे कर्ज चारही महामंडळाच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. खरेतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस वर सांगितलेल्या चारही महामंडळांचे संचालक, सचिव आणि अतिरिक्त सचिव उपस्थित होते.