लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 10 लाखाचे कर्ज

लाडकी बहिणी योजना ही गेल्या वर्षी सुरु झाली आहे आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. दुसरीकडे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही 2100 रुपये देऊ अशी सरकारने घोषणा केली होती. दरम्यान याच बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा लाभ हा 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिणी योजना ही गेल्या वर्षी सुरु झाली आहे आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात असून आतापर्यंत या योजनेचे एकूण नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब अशीच याचा दहावा हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

दुसरीकडे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही 2100 रुपये देऊ अशी सरकारने घोषणा केली होती. यामुळे या योजनेअंतर्गत 2100 चा लाभ कधीपासून मिळणार हा मोठा सवाल महिला वर्गाकडून उपस्थित होतोय.

दरम्यान याच बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता होती मात्र असं काही घडलं नाही.

यामुळे सरकार महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. पण आता याच बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं अनेक जण बोलतात.

कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7 लाख 20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये पेन्शन, होणारे पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचा व्याज जाईल.

राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. विरोधक ही योजना बंद करतील असं म्हणत होते. अनेक महिला भेटल्या. त्यांनीही मला विनवलं 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी नाही म्हटलेलं नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार.

पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता कसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचं, कामगारांना काय द्यायचं, मागासवर्गीयांना काय अल्पसंख्यांकांना काय? सगळी सोंग करता येतात पैशांची सोंग करता येत नाहीत. मला योजना चालू ठेवायची आहे.

सरकारला चालू ठेवायची आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केल आहे. जर तुम्हाला 50 हजार कर्ज काढून, एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे.

लाडकी बहिण योजनेच्या 20 महिला आल्या एकत्र आल्या तर 20 × 50,000 साधारण 10 लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 20 महिलांचे घेण्याला 30 हजाराने पैसे येतील. तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल. हा उपाय राज्य सरकारने आणला आहे असे अजित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe