Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हप्ते वितरित करण्यात आले असून याचा दहावा हप्ता दोन मे 2025 रोजी पात्र महिलांना देण्यात आला.

महत्वाची बाब अशी की याचा अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती सुद्धा हाती आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हफ्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.
केव्हा जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात अकरावा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या लाभार्थी महिला याच्या पुढील हफ्त्याची वाट पाहत आहेत. खरंतर या योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या त्या महिन्याच्या शेवटी जमा होतो.
प्रत्येक महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या दरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात. एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिल महिन्यात जमा झाला नाही. एप्रिल चा लाभ हा मे महिन्यात देण्यात आला होता.
यामुळे मे महिन्याचा लाभ जून महिन्यात येणार की काय? अशा चर्चा सुरू होत्या. पण मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11 वा हप्ता हा या महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास अजून 14 दिवसांचा वेळ बाकी आहे.
यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात येत्या 14 दिवसात अकरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. 30 मे पर्यंत या योजनेचा पुढील आता महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र असे असले तरी या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ मे महिन्याच्या शेवटी जमा होणार की पुढल्या महिन्यात जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार
लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना आगामी काळात कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पवार यांनी लाडक्या बहिणींना आगामी काळात तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.
ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध केले जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
तसेच या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. पण ही योजना सध्या विचाराधीन आहे. त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होणार हे सुद्धा पाहण्यासारखे राहील.