मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेत अजूनही अर्ज करता येणार का ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळपास एक वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली होती आणि या अंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच जमा करण्यात आला होता, हे दोन्ही हफ्ते गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले होते. दरम्यान आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जून महिन्याचा हप्ता 30 जून 2024 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतोय.

खरंतर जून आणि जुलै या दोन हफ्त्यांचे पैसे जुलै महिन्यात सोबतच दिले जाणार अशी बातमी समोर आली होती. मात्र राज्य सरकारने जून महिन्याच्या हप्त्यासाठी फक्त 3,600 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता दिली आहे. यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार ?

जून आणि जुलैचा लाभ सोबतच दिला जाणार होता पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही जून महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत. विशेष बाब अशी की, जुलै महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे.

जुलै महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळू शकतो अशी बातमी समोर आली आहे. यामुळे लाडक्या बहिणींना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. 

लाडकी बहिण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती.

त्यानंतर, मग या योजनेसाठीची अर्जप्रक्रिया बंद करण्यात आली. पण अजूनही अनेक महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत. त्यामुळे या योजनेसाठी पुन्हा अर्ज करता येणार का असा सवाल उपस्थित होतो.

पण, सध्या स्थितीला या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे म्हणजेच सध्या या योजनेत तुम्हाला अर्ज करता येणार नाही. महत्त्वाची बाब अशी की या योजनेसाठी पुन्हा अर्ज करता येणार की नाही याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!