आचारसंहिता संपल्यानंतर लाडक्या बहिणींना मोठी भेट ! भविष्यात 1 हजार 500 रुपयांऐवजी……; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून पात्र लाभार्थ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे मिळाले आहेत. अर्थातच पुढील नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळी सणाचा काळ पाहता ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाकांशी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला या योजनेअंतर्गत एका वर्षात 18000 रुपयाचा आर्थिक लाभ पुरवला जाणार आहे.

ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून पात्र लाभार्थ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे मिळाले आहेत. अर्थातच पुढील नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळी सणाचा काळ पाहता ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

सध्या मात्र ही योजना आचारसंहिता सुरू असल्याने तात्पुरती बंद करण्यात आली. या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून या अंतर्गत वितरित होणारा आर्थिक लाभ आणि अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला आहे.

तसेच या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? याबाबत ही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणालेत की, कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार.

तसेच पुढे बोलताना विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींना मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. एवढेच नाही तर या योजनेचा पैसा हा वाढत राहणार म्हणजेच सध्याची 1500 रुपयांची रक्कम भविष्यात वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

नक्कीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ जर भविष्यात वाढवला गेला तर याचा महिलांना फायदा होणार आहे. कोट्यावधी महिलांची आर्थिक परिस्थिती यामुळे सुधारणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe