Ladki Bahin Yojana : तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का अहो मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हफ्त्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. दरम्यान आता या योजनेचा एप्रिल 2025 चा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच 08 मार्च 2025 रोजी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली. या दिवशी फडणवीस सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले.
आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा एप्रिल महिन्यातच दिला जाणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे.
यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खरंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून म्हटले जात होते.
मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित होऊन अनेक महिने उलटल्यानंतरही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता होती मात्र अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय झाला नाही. पण अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणीने 2100 रुपयांचा लाभ मिळणार अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. परंतु एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत.