तारीख ठरली ! लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार जुलै महिन्याचा हप्ता, 3000 कोटी रुपयांचा निधी वर्ग, शासन निर्णय जारी

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने 30 जुलै रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच देण्यात आला आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सुद्धा समोर आली आहे. 

कधी मिळणार जुलै महिन्याचा हफ्ता ?

फडणवीस सरकारने नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असल्याने याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करून देण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने जीआर म्हणजे शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.

काल 30 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची उपलब्धता झाली असल्याने आता येत्या दोन-तीन दिवसात प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसा जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

खरे, तर महायुती सरकारनं आधीच लाडकी बहीण योजनेसाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच तरतुदीतून आता 2,984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत.

दरम्यान, तरतूद करण्यात आलेल्या रकमेतून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो.

जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सोबत मिळणार का?

मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियामध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला होता.

मात्र सरकारने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार यावेळी देखील महिलांना फक्त एकाच महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत हे क्लिअर झाले आहे.

जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी फडणवीस सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला असून या हप्त्याचा लाभ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe