महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गुड न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरंतर मे महिन्याच्या प्रारंभी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला. आता एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्यात जमा झाला असल्याने मे महिन्याचा हप्ता कोणत्या महिन्यात जमा होणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे आणि याच बाबत आता सरकारकडून मोठी माहिती देण्यात आली आहे. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार याच संदर्भात सरकारमधील मंत्र्यांकडून मोठे अपडेट समोर येत आहे, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याबाबत मोठी माहिती दिलेली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांची मदत दिली जात आहे.

या योजनेअंतर्गत सुरुवातीला ऑगस्ट 2024 मध्ये पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना सोबतच मिळाला होता.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 अशा दहा हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून यामुळे या योजनेच्या पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडक्या बहिणींना एकूण पंधरा हजार रुपयांची मदत मिळाली आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मे महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार ?

अजित पवार यांनी काल 20 मे 2025 रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा लाभ मिळणार आहे. खरे तर मे महिना आता संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता 2-3 मे 2025 दरम्यान महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असे सुद्धा बोलले जात होते. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी या संदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे.

अजित पवारांनी सांगितले की, त्यांनी पावणे चार हजार कोटींच्या फाईलवर सही केली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहीणींचे पैसे आता मिळतील. शिवाय, आदिती तटकरे यांनीही असे सांगितले की लाडक्या बहीणींचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत. त्यांच्या फाईलवर सही केली गेली आहे.

त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 20 मे नंतर ही प्रक्रीया सुरू होईल आणि पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!