मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली असून यामुळे सध्या लाडक्या बहिणींमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जात आहे.

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

महत्वाची बाब अशी की लवकरच या योजनेचा मे महिन्याचा लाभ देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा हप्ता म्हणजेच या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असे असतानाचं आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, आता आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेमकी काय घोषणा केली आहे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

काय म्हणालेत अजित पवार? 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना तब्बल 40 हजारांपर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष बाब अशी की हा कर्जप्रस्ताव लवकरच प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी बँकांशी चर्चा केली जाणार असल्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या या नवीन प्रस्तावानुसार, पात्र महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, या योजनेचा पात्र महिलांना दिल्या जाणारे कर्जाचे हप्ते या योजनेतुन वळते केले जातील,

जेणेकरून महिलांना कोणतीही अडचण भासणार नाही अशीही माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

महत्वाची बाब अशी की लवकरच हा निर्णय अंमलात येण्याची शक्यता आहे. तथापि याबाबतचा अधिकृत निर्णय कधीपर्यंत होणार ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 45 हजार कोटींचा लाभ 

लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून लाभ दिला जात असून याचा प्रत्यक्षात लाभ ऑगस्ट 2024 पासून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. राज्य सरकार लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. या योजनेचा दहावा हप्ता नुकताच वितरीत करण्यात आला आहे.

दरम्यान या योजनेसाठी सरकारने आतापर्यंत 45 हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दरम्यान या योजनेचा हप्ता काही वेळा थोड्या उशिराने जमा होत असला तरी अफवांवर विश्वास ठेवू नये, योजना बंद होणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News