लाडक्या बहिणींना बसणार मोठा फटका ! फडणवीस सरकारचे मोठी कारवाई, ‘या’ महिलांचा हफ्ता बंद केला जाणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही राज्यातील सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना म्हणून ओळखली जाते. मात्र आता या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आहे. मध्यप्रदेश राज्यशासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेचा लाभ राज्यातील विधवा, विवाहित, परित्यक्त्या, निराधार महिलांना लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्याचा लाभ मिळाला आहे. म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना आतापर्यंत 13500 मिळाले आहेत. या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले.

महत्त्वाची बाब अशी की लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा लाभ सुद्धा लवकरच दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाईल असे म्हटले जात आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा महिना संपण्याच्या आधीच महिन्याचा लाभ मिळेल यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता करू नये असे आश्वासन दिलेले आहे. मात्र, असे असतानाच लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना आता योजनेचा हप्ता मिळणार नाही.

कोणत्या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ?

खरेतर, सध्या संपूर्ण राज्यभर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटींचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचा शोध सुरू असल्याची माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या व एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची शासनाच्या माध्यमातून तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यात पात्र महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे. या योजनेचा लाभ फक्त अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थिनींची पडताळणी आता दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

किंबहुना काही ठिकाणी ही पडताळणी सुरू देखील झाली आहे. जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे साडेअकरा लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आलेत अन निवडणुकीच्या काळात घाईघाईत सर्वच महिलांना याचा लाभ मिळाला आणि यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला.

दरम्यान आता सरकारकडून या योजनेसाठी लागू करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे अगदीच काटेकोर पद्धतीने अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे या योजनेतून लाखो महिला वगळल्या जाण्याची शक्यता आहे. तर आत्तापर्यंत लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यभरातील बारा लाखाहून अधिक महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकरी सन्मान योजनेचा म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही लाभ कमी करण्याचा निर्णय झालेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News