Ladki Bahin Yojana | जुलैचा हफ्ता जमा होण्याआधीच फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा चर्चेत

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच या योजनेबाबत अजितदादांकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. योजनेची घोषणा गेल्यावर्षी जून महिन्यात झाली आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून याचा प्रत्यक्षात लाभ मिळू लागला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या अंतर्गत जुलै 2024 ते जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत.

दरम्यान आता जुलै महिन्याचा हप्ता देखील लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पुढील महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण येतोय आणि यामुळे फडणवीस सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे सुद्धा म्हटले जात आहे.

या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे याबाबत सरकारकडून काय निर्णय होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण पुढील हप्त्याचा निर्णय होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात मोठे अपडेट दिले आहे. 

अजितदादांची घोषणा काय?

सरकारने ही योजना सुरू करताना यासाठी काही निकष लावले होते मात्र अनेकांनी या योजनेचे निकष डावलून याचा लाभ घेतलाय. दरम्यान अपात्र लाभार्थ्यांकडून या योजनेचा लाभ उचलला जात असल्याचे समोर आल्यानंतर शासनाकडून अशा अपात्र लोकांना योजनेतून वगळण्याचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या योजनेचा अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनी, सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या योजनेचा एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळतो मात्र काही ठिकाणी एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

एवढेच नाही तर 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. यामुळे आता या महिलांची नावे या योजनेतून कमी केली जात आहेत.

विशेष बाब अशी की, लाडकी बहीण योजनेचा राज्यातील जवळपास 14 हजार पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याची बाब समोर आली असून ज्या पुरुषांनी अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून या योजनेचे पैसे वसूल केले जातील अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe