लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर काय करणार ? खात्यात पैसे आले नसतील तर ‘हे’ काम करायलाच हवं, वाचा…

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही राज्यातील शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून ही योजना चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र ठरणाऱ्यां महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या महिलांचा आनंद गगनात मावत नाहीये. सर्वत्र योजनेचे पैसे जमा झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेची चर्चा रंगली आहे.

ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे ते सर्वजण एकमेकांना फोन करून या योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत की नाही याची विचारणा करत आहेत.

ज्या महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झालेत ते खूपच आनंदी आहेत मात्र ज्यांना अजून या योजनेचा पैसा मिळालेला नाही त्या सर्व महिला चिंतेत सापडल्या आहेत. या योजनेचा पैसा नेमका त्यांच्या खात्यावर जमा का होत नाहीये? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

म्हणून ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरला असेल मात्र योजनेचे पैसे अजून त्यांच्या खात्यात जमा झालेले नसतील त्यांच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण ज्या महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा अजून जमा झालेला नसेल त्यांनी काय करावे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

योजनेचा पैसा मिळाला नाही तर काय करणार?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते यापैकी ज्यांचे वय बसत नाही, म्हणजेच 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच आधारकार्ड आणि अर्जातील नावात बदल, बँक पासबुकवरील खाते क्रमांक अस्पष्ट दिसणे, अशा अर्जदारांना अटी पूर्ततेसाठी संधी देण्यात आली आहे.

पण, त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांचे अर्ज मंजुर झाल्यानंतरही बँक खात्यात पैसे वर्ग होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत.

यामुळे जर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळालेले असतील तर सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत संलग्न आहे की नाही हे चेक करा. जर आधार क्रमांक आणि बँक खाते संलग्न नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे. बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न झाल्यानंतर लगेच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!