Ladki Bahin Yojana Installment : गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी एक नवीन योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे या नव्या योजनेचे नाव. या योजनेतुन पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान आता या योजनेच्या जुलैच्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. जुलैचा हप्ता कधी मिळणार आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच मिळू शकतात का असे काही प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता ऑगस्ट महिन्यात फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
ऑगस्ट महिन्यात मिळणार दुहेरी आर्थिक लाभ
लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान याच रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाणार असल्याचा दावा केला जातोय.
वास्तविक गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना पहिल्यांदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरीत्या देण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेचे सुरुवातीचे दोन हप्ते सोबतच जमा केले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना एकाच वेळी दोन हप्त्यांचा लाभ मिळाला त्याच धर्तीवर याही वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम लाडक्या बहिणींना दिले जाऊ शकते असेही बोलले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देखील या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.