लाडक्या बहिणींची निराशा होणार ! 2100 रुपयांचा लाभ देणे अशक्य, कारण….; सरकारमधील मंत्र्यांनीच केली पोलखोल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच एक विधान सध्या चर्चेत आल आहे. त्यांनी सध्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देता येणार नसल्याचे म्हटले आहे.

Updated on -

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने एक मोठे ट्रंप कार्ड खेळल. राज्यातील महिलांना आकर्षित करण्यासाठी गेल्या शिंदे सरकारने ऐन निवडणुकीच्या आधीच लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर 2100 रुपये दिले जातील अशी मोठी घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांकडून केली गेली. आता निवडणुका झाल्यात, पुन्हा महायुतीचे सरकार पण आले मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ काही मिळत नाहीये.

यामुळे लाडक्या बहिणींकडून आम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार हा सवाल उपस्थित होतोय. अशी सारी परिस्थिती असतानाच विरोधकांकडून ही योजना लवकरच गुंडाळली जाईल असा आरोप होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात या योजनेला सरकार बंद करू शकते असा मोठा आरोप करत सरकारला घेरले आहे.

दुसरीकडे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठे विधान केले. अजितदादा यांनी तूर्तास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अशक्य असल्याची कबुली दिली.

दरम्यान आता शिवसेना शिंदे गट नेत्या नीलम गोऱ्हे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक वक्तव्य दिल आहे जे की विशेष चर्चेत आलय. लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

राज्य सरकारला आता लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपये देणे शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. जेव्हा सरकारला शक्य होईल तेव्हा सरकार लाडक्या बहिणींना दीड हजारावरून 2 हजार 100 रुपये देईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील टिकेनंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी या योजनेबाबत भाष्य केल आहे. या योजनेमुळे सरकारवर ताण येतोय, हे खरंय पण लाडक्या बहिणींना आम्ही वा-यावर सोडणार नाही. उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे असं शंभुराज देसाई, प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

पण, 2100 रुपयांबाबत संभ्रमावस्था अजूनही कायम असून हा सस्पेन्स नेमका कधी संपणार? सरकार खरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार की महायुतीची घोषणा ही निवडणुकीचा जुमला होता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आगामी काळात शोधण विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

हे पण वाचा : वाईट काळ संपला ! 6 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, 100% नशिबाची साथ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe