लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! 2100 सोडा ‘या’ महिलांना 1500 पण मिळणार नाहीत, कारण काय?

सुरुवातीला राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक फायदा मिळतं होता.

Published on -

Ladki Bahin Yojana Latest News : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.

पण आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होत असून काही महिलांना यापुढे केवळ 500 रुपये मिळणार असल्याची बातमी समोर आली आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक फायदा मिळतं होता.

या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 2025 या नऊ महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

मार्च महिन्यापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात सरकारकडून या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे बोलले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयांच्या रकमेत आणखी वाढ केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पण असे असतांनाच आता सरकारने काही लाभार्थ्यांसाठी हा निधी कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या महिलांना अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळतो, त्यांना लाडकी बहीण योजनेत संपूर्ण रक्कम मिळणार नाही. विशेषतः नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर याचा परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्रातील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलेला आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलेला दरवर्षी 12,000 रुपये मिळत असल्याने या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतुन केवळ 6,000 रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.

त्यामुळे या महिलांना दरमहा 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळतील. या बदलामुळे जवळपास सव्वा आठ लाख महिलांना योजनेचा संपूर्ण लाभ घेता येणार नाही. यामुळे अनेक महिला नाराज असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे, सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 1400 कोटी रुपयांचा आर्थिक भार कमी होईल, असा अंदाज आहे. सरकारच्या तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

खरे तर अजून याबाबतचा अधिकृत निर्णय झालेला नाही मात्र पुढील काही दिवसांत यासंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे खरंच सरकार असा निर्णय घेणार का आणि या निर्णयानंतर लाडक्या बहिणीची भूमिका काय राहणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe