लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान, एका घरात दोन बहिणी असतील तर……..

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांना मिळतो. ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News : शिंदे सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जातोय. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांना मिळतो.

ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.

म्हणजेच लाडकी बहिण योजनेचे एकूण साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग करण्यात आले आहेत. दुसरीकडे आता याच योजनेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. खरे तर लाडकी बहिणी योजनेची चर्चा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील महायुती सरकारला फायदा होईल असा दावा सुद्धा होतोय. दुसरीकडे याच योजनेच्या धरतीवर काँग्रेसने देखील आपल्या जाहीरनाम्यात एका योजनेचा उल्लेख केला आहे.

महाविकास आघाडी सरकार आल्यास राज्यात गृहलक्ष्मी योजना राबवली जाणार आणि या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये मिळणार असे महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात म्हटले आहे.

महत्त्वाची बाब अशी की कर्नाटक मध्ये असणाऱ्या काँग्रेस सरकारने तेथील महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना राबवली देखील आहे. दरम्यान आता कर्नाटक राज्यात सुरू असणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेत आणि महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेत नेमका फरक काय आहे याच संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे.

कर्नाटकमध्ये त्यांची गृहलक्ष्मी योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की, कर्नाटकमध्ये एका घरातल्या एक बहिणीला याचा लाभ मिळतो.

पण आपल्या महाराष्ट्रात एक घरात दोन बहिणी असल्या तरीसुद्धा त्यांना याचा लाभ मिळेल, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आम्ही भेदभाव करत नाही. जातीपातीचा भेदभाव नाही.

मराठी माणसांना, उत्तर भारतीयांना, हिंदूना, मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, सर्वांना या योजनेचा लाभ मिळतोय. आम्ही त्यात काही बदल केला नाही. आमची योजना सर्वसमावेशक आहे. लाडक्या बहिणींना आधार मिळण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केलीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe