Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही फडणवीस सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातोय.

जुलै 2024 पासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात एकूण दहा हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या कालावधीमधील एकूण दहा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे 2025 रोजी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी मे महिन्याचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या
खात्यात जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या सूत्रांकडून समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या महिलांना एकूण पंधरा हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.
पण आता या योजनेचा मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही महिलांना मिळणार नाही. 21 ते 65 वर्षे वयोगटात बसणाऱ्या काही महिलांना याचा लाभ मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला 21 ते 65 वर्षे वयोगटात बसतात पण ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेतून लाभ मिळणार नाही.
यासोबतच ज्या महिला शासकीय सेवेत आहेत किंवा ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळता जर इतर चार चाकी वाहन असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे म्हणजेच राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. एकंदरीत वर सांगितलेल्या या निकषांमध्ये ज्या महिला फिट बसत नाहीत त्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही.
मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
खरे तर एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला. यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा सवाल लाडक्या बहिणीकडून उपस्थित होतोय. ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता उशिराने जमा झाला तसाच मे महिन्याचा हप्ता पण उशिराने जमा होणार का? असाही सवाल महिलांकडून उपस्थित होतोय.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित होण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.