Ladki Bahin Yojana : राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून मिळत आहे.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. दुसरीकडे या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो याबाबतही एक नवीन अपडेट हाती आल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल 2025 दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र यावेळी देखील पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत.
खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून आमचे सरकार पुन्हा एकदा आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली होती. महायुतीच्या पहिल्या फळीमधील नेत्यांनी स्वतः ही घोषणा केली होती.
यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात 2100 बाबत काहीतरी सकारात्मक निर्णय होणार असे म्हटले जात होते. पण अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय झाला नाही. म्हणून एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत महिलांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत. दरम्यान, आता याच योजनेच्या बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ वक्तव्य केल आहे.
काय म्हणालेत अजितदादा?
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलं नाही, पण आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पैसा एकाच वेळी खात्यात
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाडक्या बहिणींना एकाच वेळी देण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च रोजी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. दरम्यान आता एप्रिल महिन्याचा पैसा 6 एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात जमा करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी समोर आली आहे.