लाडक्या बहिणींची पडताळणी थांबली, ‘या’ तारखेला सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जुलैचे 1500 रुपये !

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळतोय आणि आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

ही योजना गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगदीच तोंडावर जाहीर करण्यात आले यामुळे तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले त्यांना सरसकट पंधराशे रुपयांचा लाभ दिला.

विधानसभा निवडणुकीमुळे त्यावेळी सरकारला अर्जांची काटेकोर पडताळणी करता आली नाही. मात्र आता लाडक्या बहिणीच्या अर्जांची काटेकोर पडताळणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता वेगवेगळ्या अटी आणि कारणांमुळे बाद केले जात आहे.

यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या सरकार विरोधात प्रचंड असंतोषाची भावना आहे. या नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू शकतो आणि या मुद्द्याचे विरोधकांकडून चांगलेच भांडवल केले जाऊ शकते अशी शक्यता आहे.

दरम्यान महिलांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत नवीन धोरण स्वीकारल आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी नो चाळण, नो गाळण असे धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजे जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत तरी या योजनेतील महिलांची आता पडताळणी होणार नाही. 

लाखो लाडक्या बहिणींना वगळले 

मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस सरकारकडून जून महिन्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दोन लाख तीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले आहे. तसेच एक लाख दहा हजाराहून अधिक महिलांना 65 वर्षाहून अधिक वय असल्याने बाद केले आहे.

शिवाय 1.60 लाख महिलांना घरात चारचाकी वाहन असल्याने बाद केले आहे. 7.70 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने या योजनेतून वगळले आहे. सरकारी कर्मचारी असणाऱ्या 2652 महिलांना या योजनेतून वगळले आहे.

म्हणजेच जून महिन्यात एकूण 12 लाख 72 हजार 652 महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत या योजनेतून जवळपास 19 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांचे पंधराशे रुपये सरकारकडून बंद करण्यात आले आहेत.

यामुळे राज्यातील महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. पण आता सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत नो चाळण नो गाळण हे धोरण स्वीकारलेले आहे. 

जुलैचा हप्ता कधी मिळणार?

लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै च्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याचा हफ्ता जमा करण्यात आला. यामुळे आता जुलै चा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय.

लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीमधील एकूण बारा हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि तेरावा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट 2025 च्या आत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.