लाडकी बहिण योजनेबाबत मोठे अपडेट ! ‘या’ महिलांच्या खात्यात एकाच वेळी जमा होणार 3,000 रुपये, वाचा सविस्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होऊ शकतात.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर ही योजना गेल्या वर्षी सुरु करण्यात आली आहे. जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि त्यानंतर जुलै 2024 पासून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात आर्थिक लाभ जमा होण्यास सुरुवात झाली.

या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै 2024 ते जून 2024 या काळातील एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. ही योजना राज्यात सगळीकडे सुपरहिट आहे.

या योजनेच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार आले. पण या योजनेबाबत आता काही अडथळे सुद्धा समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन निकष लावल्यामुळे काही महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचं पोर्टल सुद्धा बंद आहे. एवढेच नाही तर काही महिलांना जून महिन्याचा लाभ मिळाला नसल्याची बाब सुद्धा समोर आलेली आहे. जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली.

जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी राज्य सरकारकडून 3,600 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली. यानंतर जुलै च्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात मिळाला. पण अशाही काही महिला आहेत ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे.

या महिलांना मिळणार तीन हजार रुपयांचा लाभ 

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी जमा केला जाणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असून जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला असला, तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही. दरम्यान ज्या महिलांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता जुलै महिन्याच्या हप्ता सोबतच जून महिन्याचा हप्ता दिला जाऊ शकतो.

म्हणजेच राज्यातील काही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!