Ladki Bahin Yojana : तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का? अहो मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. खरे तर, लाडक्या बहिणीच्या खात्यातून नुकत्याच काही तासांपूर्वी एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा झाला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ? हा देखील सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळत असून आत्तापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण दहा हफ्त्यांचा पैसा जमा करण्यात आला आहे.

यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा देखील समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या 10 महिन्यांचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याचा लाभ हा दोन मे 2025 पासून प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यातील जवळपास सर्वच पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे, अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर येतेय.
पण लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार? असाही सवाल काही लाडक्या बहिणींच्या माध्यमातून उपस्थित होतोय. दरम्यान, आता याच संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कधी जमा होणार मे महिन्याचा हफ्ता ?
लाडक्या बहिणीच्या खात्यात आत्तापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीमधील एकूण दहा हप्ते म्हणजेच पंधरा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार ? असा प्रश्न विचारला जात आहे.
खरंतर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा नुकताच जमा झालाय, या हफ्त्याला अजून जास्त वेळही झालेला नाही. पण, एप्रिलचा हफ्ता मे महिन्यात जमा झाला असल्याने मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित होतोय.
खरेतर, एप्रिल महिन्याचा हप्ता बरेच दिवस लांबणीवर पडला म्हणून मे महिन्याचा हप्तादेखील असाच लांबणीवर जाणार का असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो असा मोठा दावा केला जात आहे.
खरेतर, मागील अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता हा शेवटचा दोन आठवड्यांमध्ये जमा होतो. हेच कारण आहे की, मे महिन्याचा हफ्ता देखील लाडक्या बहिणींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो असा अंदाज समोर येत आहे.