लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 2100 नाही तर ‘या’ महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3 हजार रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील काही महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांनी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. 

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आर्थिक लाभ जमा केला जातोये. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

म्हणजेच या योजनेतून एका वर्षात तब्बल 18000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे.

या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा लाभ वितरित करण्यात आला असून मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशी माहिती हाती आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ मिळेल असाही दावा केला जातोये. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा केली होती.

मात्र या घोषणेबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी याबाबत निर्णय होईल असे सुतोवाच केले आहे तर दुसरीकडे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाली झाली की लाडक्या बहिणींचा लाभ वाढवला जाईल असे म्हटले आहे.

यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या सरकारच्या विरोधात नाराजी सुद्धा आहे. महायुतीचे सरकार स्थापित होऊन आता बरेच दिवस झाले आहेत तरीही 2100 रुपयांबाबत निर्णय होत नसल्याने सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

एकीकडे अशी सारी परिस्थिती सुरू असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळणार आहेत.

या महिलांना मिळणार 3 हजार रुपये

खरेतर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत एप्रिल 2025 चा हप्ता 2 मे रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे आता पात्र महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, काही पात्र महिलांना मे 2025 च्या हफ्त्यासोबत 3 हजार रुपये मिळू शकतात.

सध्या, लाडकी बहिन योजना योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. तथापि, काही महिलांना तांत्रिक समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे अद्याप एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही.

यामुळे आता या संबंधित महिलांना एप्रिल आणि मे दोन्ही यांचे हप्ते सोबतच दिले जातील असा दावा केला जातोय. म्हणजेच ज्या महिलांना काही तांत्रिक कारणांमुळे एप्रिलचा लाभ मिळालेला नाही त्यांना एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मे महिन्याच्या हफ्त्यासोबत मिळण्याची शक्यता आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार

एप्रिल चा हप्ता दोन मे रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र सरकारच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच जमा होण्याची दाट शक्यता आहे.

या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय. त्यामुळे आता मे महिन्याचा लाभ तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News