लाडकी बहीण योजनेबाबत सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार ! आता महिलांना……..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून याच योजनेच्या बाबत एक नवीन माहिती समोर येत आहे. फडणवीस सरकार येत्या काही दिवसांनी एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. दरम्यान आता याच योजनेबाबत एक नव अपडेट हाती आल आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये फडणवीस सरकार या योजनेबाबत लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

खरे तर ही योजना सुरू होऊन आता दहा महिन्यांचा काळ पूर्ण होणार आहे. जुलै 2024 मध्ये या योजनेचा पहिला हप्ता महिलांना देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

याचा पहिला हप्ता जुलै महिन्यात मिळाला आणि त्यानंतर एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेत. मार्च 2025 पर्यंत महिलांच्या खात्यात नऊ हप्ते जमा झाले आहेत.

मार्च महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

7 एप्रिल पासून ते 10 एप्रिल दरम्यान महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय. असे झाल्यास राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही अक्षयतृतीयाची मोठी भेट ठरणार आहे.

दुसरीकडे काही महिलांच्या माध्यमातून या योजनेत अजूनही अर्ज करता येणार का ? असा सवाल उपस्थित होतोय. खरेतर, लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. जून महिन्यात ही योजना सुरु करण्यात आली होती.

या योजनेत सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती. त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. या मुदत वाढीनंतर राज्यातील महिलांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली.

यानंतर योजनेसाठीची अर्जप्रक्रिया बंद झाली. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अर्ज प्रक्रिया बंदच आहे. पण सरकार यासंदर्भात येत्या काही दिवसात निर्णय घेऊ शकतो.

म्हणजे ज्या महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज करता आले नाहीत त्यांना अर्ज करण्यासाठी मुदत मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र याबाबत अजून तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

म्हणून सरकार खरच असा निर्णय घेणार का ? हे पाहणे विशेष खास ठरणार आहे. पण जर लाडकी बहिण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली तर राज्यातील महिलांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe