लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! जुलैचा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या ‘या’ तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात खात्यात जमा होईल असे संकेत मिळत आहेत.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहिण योजना चर्चेत आली आहे. या योजनेच्या अर्जदारांची सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आले असून या पडताळणीअंती लाखो महिला या योजनेतून बाद केल्या जात आहेत.

यामुळे विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे तर दुसरीकडे महिलांमध्ये देखील सरकार विरोधातील नाराजी वाढत चालली आहे. मात्र फडणवीस सरकारमधील मंत्री ही योजना श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठी आहे आणि यामुळे या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केले जात आहे असे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली. या योजनेला आता बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला असून या अंतर्गत जुलै 2024 ते जून 2024 या कालावधीमध्ये एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या तेराव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे आणि याच संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

कधी जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता 

जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आणि यामुळे आता जुलै चा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. जुलै महिना संपण्यास आता फक्त सात ते आठ दिवसांचा काळ बाकी आहे पण अजूनही फडणवीस सरकारने जुलै च्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली.

मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे.

जर समजा जुलै अखेरपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला नाही तर 5 ऑगस्ट 2025 पर्यंत जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

म्हणजेच येत्या सात-आठ दिवसात जुलै महिन्याचे पैसे येण्याची शक्यता आहे पण जर समजा या वेळेत जर पैसे जमा झाले नाही तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होईल.

दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत दहा लाख महिलांना बाद करण्यात आले असल्याची धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. यामुळे आता पुढील हप्ता राज्यातील बऱ्याचश्या महिलांना दिला जाणार नसल्याचे स्पष्ट होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!