लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. लाडक्या बहिणींना कालपासून जून महिन्याचा हप्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि याची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळतोय. या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

सध्या या योजनेच्या बाराव्या हप्त्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतोय. 30 जून 2025 पासून म्हणजेच कालपासून या योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे, नक्कीच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे आणि आता महिला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात मिळाला असल्याने जुलै महिन्याचा लाभ कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. 

जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते मिळाले आहेत.

खरे तर जून महिन्याच्या हप्ता सोबत जुलै महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. शिवाय जून महिन्याचा हप्ता जून मध्ये मिळाला नाही यामुळे जुलै महिन्यात जुन आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना सुद्धा होती.

मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. सरकारकडून यावेळी फक्त जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3600 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

म्हणजेच लाडक्या बहिणींना कालपासून फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणींनी चिंता करण्याचे कारण नाही कारण की, जुलै महिन्याचे पैसे जुलै महिन्यातच मिळतील अशी बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

खरे तर जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार याची अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेले नाही पण या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता जमा केला जाईल असे दिसते.

नक्कीच जुलै महिन्याचा हफ्ता जुलैमध्येच जमा झाला तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्यातच एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि यामुळे त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!