Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाकडून गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठे अपडेट समोर येत आहे. राज्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेची घोषणा जून महिन्यात झाली होती आणि जुलै 2024 पासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ दिला जातोय.

आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी नुकतीच एक मोठी गुड न्यूज दिली आहे. खरे तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला.
यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागून आहे. दरम्यान याच लाखो लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी एक मोठी खुशखबर दिली आहे.
काय म्हटलेत अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना लगेचच पुढील हप्ता मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
काल, 29 जून 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी असे सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच एकूण 3 हजार 600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत.
यामुळे आजपासून म्हणजेच 30 जून 2025 पासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का?
खरंतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. जून महिन्याच्या हफ्त्याला उशीर होत असल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत दिले जातील असे म्हटले जात होते.
विशेष बाब अशी की आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असाही दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र आज पासून म्हणजे 30 जून पासून जून महिन्याचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे जुलै महिन्याचा लाभ हा पुढील जुलै महिन्यातच मिळणार आहे.