Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
म्हणजेच या योजनेतून एका वर्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात 18 हजार रुपयांचा लाभ जमा होतो. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण दहा हप्त्याचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या महिला या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच लाभ घेत आहेत त्यांना आत्तापर्यंत पंधरा हजार रुपये मिळाले आहे.

दुसरीकडे या योजनेचा अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो, याबाबतही आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अकराव्या हप्त्याची संभाव्य तारीख नुकतीच समोर आली असून आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
‘या’ 10 हफ्त्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या कालावधीमध्ये दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा करण्यात आला. दोन मे 2025 रोजी या योजनेचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
मे महिन्याचा लाभ कधी मिळणार ?
मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास उलटत चालला आहे. येत्या दोन दिवसात मे महिन्याचा पहिला पंधरवडा संपणार आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
खरे तर एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन मे रोजी वर्ग करण्यात आला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असाही प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित होतोय. मात्र मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात मिळणार नाही तर मे महिन्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
आज मे महिन्याची 13 तारीख असून येत्या पंधरा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता हा येत्या पंधरा दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
हा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग होईल असे सांगितले जात आहे. खरेतर, गेल्या अनेक महिन्यापासून या योजनेचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये दिला जातो.
त्यामुळे या महिन्यात देखील तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत अधिकृत माहिती देतील असा दावा केला जातोय.