Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.
यातील फेब्रुवारी महिन्याचा पैसा नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. फेब्रुवारीचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांना देण्यात आला असून आता या योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.

काय आहे नवीन अपडेट
खरे तर या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होईल असा दावा करण्यात आला होता. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे अवचित्य साधून आठ मार्च रोजी म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार होता.
मात्र, प्रत्यक्षात महिलादिनी महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात नुकताच म्हणजे काल आठ मार्च 2025 रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.
महिलांच्या खात्यात सहा मार्च पासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 8 मार्चपर्यंत राज्यातील जवळपास सर्वच महिलांच्या खात्यात या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा पैसा जमा करण्यात आला आहे.
मार्च महिन्याचा पैसा कधी जमा होणार?
दरम्यान, मार्चचा हप्ता कधी जमा होणार ? याच्या प्रतिक्षेत आता लाडक्या बहिणी आहेत. खरेतर, फडणवीस सरकारमधील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती दिली होती.
मात्र, प्रत्यक्षात असे काही झाले नाही. महिला दिनी पैसा जमा झाला परंतु फक्त फेब्रुवारी महिन्याचाचं पैसा जमा झाला. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रूपये जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेत, पण तरीही लाभार्थी महिला निराश झाल्यात कारण की मार्च महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात आलेला नाही.
परंतु लवकरच मार्च महिन्याचा पैसा देखील महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार मार्च महिन्याचा पैसा होळीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातचं जमा केला जाणार आहे.
15 मार्च 2025 च्या आधीचं मार्च महिन्याचा पैसा महिलांना दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे. परंतु सरकारकडून याबाबत कोणतीचं अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे 15 मार्चच्या आधीच महिलांना हा लाभ मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.