लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मुहूर्तावर जमा होणार मे महिन्याचा हफ्ता, 1500 मिळणार की 2100, समोर आली मोठी अपडेट

तुम्ही लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहात का किंवा तुमच्या परिवारातून कोणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, लाडक्या बहिणींना नुकत्याच काही दिवसांपूर्वी एप्रिलचा हप्ता मिळाला आहे आणि आता त्यांना मे महिन्याची आतुरता लागली आहे. दरम्यान, याच संदर्भात आता एक नवीन अपडेट हाती आली आहे. 

Published on -

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला. दोन मे 2025 रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले. खरंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा आत्ता हा 30 एप्रिलच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी आशा होते मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला.

यामुळे आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला असल्याने आता मे महिन्याचा लाभ कधी जमा होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे आणि याच संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट देखील समोर आले आहे.

कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता ?

खरे तर, एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे आणि अशातच आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत विचारणा होऊ लागली आहे. याचे कारण असे की अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच दिले जातील असे बोलले जात होते.

मात्र प्रत्यक्षात सरकारने एप्रिल आणि मी या दोन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा केले नाहीत. दोन मे रोजी फक्त एप्रिल महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला. मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला होता.

आठ मार्च 2025 रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता. यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे हप्ते देखील एकाच वेळी जमा होऊ शकतात असा अंदाज होता आणि अनेकांच्या माध्यमातून असाच दावा सुद्धा केला जात होता.

पण सरकारने सध्या स्थितीला फक्त एप्रिल महिन्याचा लाभ जमा केला आहे. यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता जसा लांबणीवर पडला तसाच मे महिन्याचा हप्ता पण लांबणीवर पडणार का हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

पण आता याच संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे ती म्हणजे मे महिन्याचा लाभ लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेत मागील अनेक महिन्यांपासून हफ्त्याचे पैसे हे शेवटच्या दोन आठवड्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे मे महिन्यात सुद्धा लाडक्या बहि‍णींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतात.

1500 मिळणार की 2100 ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लवकरच ही रक्कम वाढवली जाणार असे आश्वासन दिले होते. यामुळे या योजनेची रक्कम वाढून 2100 रुपये कधी होणार? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय आणि पुढचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता 1500 चा मिळणार की 2100 चा हा सुद्धा मोठा सवाल आहे.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2100 रुपयांबाबत अजून शासन स्तरावर काहीही निर्णय झालेला नाही. यामुळे पुढील मे महिन्याचा हफ्ता हा पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe