Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेताय का? अहो, मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.
ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण दहा हप्त्यांचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल ? या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मागील एप्रिल महिन्याचा हप्ता या चालू मे महिन्यात जमा करण्यात आला आहे. दोन मे 2025 रोजी एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
खरे तर, मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ मिळाला होता यामुळे मे महिन्यात देखील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळतील अशी चर्चा होती. मात्र दोन मे ला फक्त एप्रिल महिन्याचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आला.
यामुळे आता मे महिन्याचा लाभ कधी जमा होणार ? हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात आला असल्याने आता मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळणार की काय अशीही शंका लाडक्या बहिणीकडून उपस्थित केली जात आहे.
मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच जमा केला जाऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत आणि यातील बहुतांशी हप्ते हे त्या-त्या महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आले आहेत.
यामुळे मे महिन्याचा लाभ देखील म्हणजेच योजनेचा अकरावा हप्ता देखील मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. मात्र, अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत खात्यात येणार ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे.