लाडक्या बहिणींची मोठी निराशा ! एप्रिलचा हफ्ता लांबणार, अक्षय तृतीयाचा मुहूर्त हुकणार, आता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र त्याआधीच त्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 9 हफ्ते जमा झाले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या कालावधीतील पैसा पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

याअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा पैसा एकाच टप्प्यात देण्यात आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एकाच टप्प्यात देण्यात आले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ 8 मार्च 2025 रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.

दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. महत्वाची बाब म्हणजे पुढील महिन्याच्या लाभाबाबत म्हणजे एप्रिल महिन्याच्या हफ्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

एप्रिलचा लाभ कधी मिळणार

खरंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा पैसा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळू शकतो अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. पण, प्रत्यक्षात एप्रिल महिना आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उद्या अक्षय तृतीया चा मोठा सण साजरा होणार आहे.

मात्र अजून तरी या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

तसेच यावरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एप्रिल महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ दिला जाईल असे म्हटले होते. मात्र तूर्तास तरी तसे होताना दिसत नाही. या योजनेचा हप्ता एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना महिना संपेपर्यंत पैसे दिले जातील, असं आदिती तटकरेंनी यांनी सांगितलं होतं. मात्र, आज 29 तारीख उजाडली आहे. म्हणजे एप्रिल महिना संपायला आता फक्त एकच दिवस उरला आहे. परिणामी याचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार का हा मोठा सवाल आहे. कारण अद्याप एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली नाही.

त्यामुळे आता एप्रिलचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार नसून हा हप्तादेखील लांबू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे ही लाडक्या बहिणीसाठी एक निराशा जनक बातमी आहे.

दरम्यान एप्रिल महिन्यात जर एप्रिलचा लाभ मिळाला नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील असे सुद्धा बोलले जात आहे. यामुळे आता या योजनेत संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe