मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ‘या’ 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि याचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2024 पासून मिळतोय. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या कालावधीमधील नऊ हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले असून आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

अशातच आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन योजनांचा लाभ घेता येत नाही.

ज्या महिला आधीच एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा मग या योजनेतून कमी रक्कम मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही तर पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे.

अर्थातच या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या योजनेत सध्या आठ लाख महिला अशा आहेत ज्या की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत.

म्हणजेच या संबंधित महिलांना आता या योजनेतुन दरमहा फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळतील आणि पीएम किसानचे तसेच नमो शेतकरीचे बारा हजार असे तिन्ही योजनांचे 18 हजार रुपये मिळणार आहेत.

दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर येत आहे. लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की याची संभाव्य तारीख सुद्धा समोर आली आहे.

कधी मिळणार एप्रिलचा लाभ

मीडिया रिपोर्ट नुसार लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात खात्यात जमा केला जाणार आहे. 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे.

दरम्यान याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींना एप्रिलचा लाभ देण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

परंतु ज्या महिला किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून एप्रिलचा हफ्ता म्हणून फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News