Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळत असून आता याच योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
खरे तर, ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा लाभ गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून मिळतोय.

जुलै 2025 पासून या योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जात असून आत्तापर्यंत या महिलांना एकूण दहा हफ्त्याचा लाभ मिळालेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या दहा महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत.
यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 या दोन महिन्यांचा लाभ 8 मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिन लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा मे महिन्यात जमा करण्यात आला आहे.
दोन मे 2025 पासून एप्रिल महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत अनेक पात्र महिलांच्या खात्यात एप्रिलचा लाभ जमा करण्यात आला आहे. अशातच आता या योजनेच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे या योजनेच्या काही पात्र महिलांना या योजनेच्या अंतर्गत एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.
कोणाला मिळणार 4500 रुपयांचा लाभ ?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसांचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा एकत्रिपतपणे लाभ दिलेला होता.
म्हणजेच 8 मार्च 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा झाले होते. पण, त्यावेळी काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जमा झालेले नव्हते.
पण आता ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत एकूण 4500 रुपये मिळणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचा पैसा एकाच वेळी या महिलांच्या खात्यात जमा होणार असून या अनुषंगाने दोन मे पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्थातच एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 4,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
काही महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार?
एकीकडे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 4,500 रुपये वर्ग होणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे.