Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
या योजनेचा पहिला अन दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 2024 चे दोन्ही हफ्ते 2024 मध्ये वितरित करण्यात आले आणि त्यानंतर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

अर्थातच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यातील एप्रिल महिन्याचा लाभ हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झालाये.
दोन मे 2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला असल्याने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता हा मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या आधीच मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे.
‘या’ महिलांना मिळणार 3 हजार रुपयांचा हफ्ता
मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजेच दहावा हप्ता मिळालेला नाही त्यांना दहावा आणि अकरावा अर्थातच एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच दिला जाऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे. मात्र, ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयांचा लाभ मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
2100 रुपयांचा लाभ कधी मिळणार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आम्ही भविष्यात 2100 रुपयांचा लाभ देऊ अशी आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असे महायुतीच्या अनेक नेत्यांकडून सांगितले गेले होते.
मात्र आता सत्ता स्थापित होऊन बऱ्याच दिवसांचा काळ उलटल्यानंतरही 2100 रुपयां बाबत सरकारकडून कोणता सकारात्मक निर्णय झालेला नाही. मे महिन्याचा हप्ता देखील फक्त पंधराशे रुपयांचाच राहणार आहे.