लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार 3 हजाराचा लाभ, वाचा सविस्तर

लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभही खात्यात जमा होणार आहे. दरम्यान आता आगामी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतच आता एक नवीन अपडेट हाती आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही गेल्या सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात या योजनेचे पैसे वाढणार आहेत. लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 तसेच जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 अशा नऊ महिन्याचा लाभ मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभही खात्यात जमा होणार आहे.

दरम्यान आता आगामी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतच आता एक नवीन अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत राज्यातील काही महिलांना पंधराशे रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासोबत कोणत्या महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या महिलांना मिळणार 3 हजाराचा लाभ ?

राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी खात्यात जमा केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

यामुळे लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाची मोठी भेट मिळणार आहे. पण यासोबत काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील असा दावा केला जातोय. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

खरेतर, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. पण, यावेळी काही महिलांना 3 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एप्रिलसोबत एकत्र याचा लाभ दिला जाणार आहे.

वास्तविक काही तांत्रिक कारणांमुळे काहीं महिलांचे हप्ते रखडले होते. यामुळे आता या अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे.

निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे महायुतीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, या योजनेतून निकषांबाहेर लाभ घेणाऱ्या काही महिलांची नावे वगळण्यात आली असून आता त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.

योजनेच्या बंद होण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ही योजना बंद होणार नाही.

त्यामुळे महिलांना दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचा लाभ पुढेही मिळत राहणार आहे. नक्कीच या योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळाला तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe