Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आलेत. दरम्यान आता या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जाऊ शकतो. 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार असे बोलले जात आहे.

अशी परिस्थिती असतानाच मात्र लाडकी बहीण योजनेच्या काही महिलांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांना आता या योजनेतून दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या महिलांना या योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळणार, सरकारने हा निर्णय का घेतला? याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून आगामी काळात ही रक्कम 2100 रुपये केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपयांचा लाभ देऊ असे सांगितले आहे.
तर दुसरीकडे या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या हप्त्याला कात्री लावली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि याच योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे.
सन्मान निधी योजनेच्या पात्र महिलांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात. लाडकी बहिण योजनेतून मात्र दरवर्षी 18 हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. दरम्यान, सन्मान निधी योजनेच्या पात्र महिलांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळत असल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता फक्त सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजे या संबंधित महिलांना आता प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत. खरेतर, राज्य अन केंद्र शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो.
मात्र असे असतांनाही केंद्र- राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत.
त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत, त्यांना दीड हजाराऐवजी आता यापुढे 500 रुपयेच दिले जाणार आहेत. पण या निर्णयामुळे आता संबंधित महिलांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत आहे.