Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेच्या खात्यात अठरा हजार रुपये जमा होतात.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एकूण दहा हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेचा पहिला हप्ता हा जुलै 2024 मध्ये मिळाला होता. आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा हफ्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत.

मे महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला होता. म्हणून आता या योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सवाल उपस्थित होतोय.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा आता सुरू होणार आहे आणि यामुळे मे महिन्याचा हफ्ता म्हणजे अकरावा हप्ता मे महिन्यात मिळणार की जून महिना उजाडणार हा मोठा यक्षप्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आता याच संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे.
कधी मिळणार मे महिन्याचा हफ्ता
मे महिना संपण्यास आता फक्त दहा दिवसांचा काय बाकी राहिला आहे. म्हणून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. दरम्यान या योजनेचा मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित केला जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जातोये. 26 ते 30 मे 2025 दरम्यान या योजनेचा अकरावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि यासंदर्भात अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे मे महिन्याचा लाभ प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
….तर मे आणि जून दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच
दुसरीकडे, जर मे महिन्याचा हफ्ता याच महिन्यात जमा झाला नाही तर पुढील जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत. पण याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. यामुळे खरंच मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत मिळणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.