Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे 2100 रुपयांच्या बाबत. खरंतर आज तीन मे 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा लाभ जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारची एक महत्त्वाची योजना. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

जुलै 2024 पासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळतोय. आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आणि आता आजपासून या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग होणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली होती.
यामुळे या योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच आता राज्य शासनाचे मंत्री उदय सामंत यांनी या योजनेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
मंत्री उदय सामंत काय म्हणतात ?
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे आर्थिक घडी व्यवस्थित झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असेच विधान केले आहे. यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या योजनेबाबत मोठे विधान केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याबाबत सध्या वर्किंग सुरु आहे.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी असे सांगितले की, ज्यावेळी यासंदर्भात निर्णय घेण्याची योग्य वेळ येईल, त्यावेळी महाराष्ट्र नक्कीच निर्णय घेणार आहे. महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या बाबत नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महिलांना फक्त 500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. ज्या महिला किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना 1500 रुपयांना ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
कारण म्हणजे सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून त्यांना वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ मिळत असतो. या योजनेच्या जीआर नुसार इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळत नाही, यामुळेच किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत.