लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; जानेवारी – फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? महिलांमध्ये संभ्रम

Published on -

Ladki Bahin Yojana : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असतानाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.

त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. मागील वेळी डिसेंबर महिन्याचा हप्तादेखील उशिरा जमा झाला होता. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता लांबणीवर पडल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबतही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार का, असा प्रश्न अनेक लाभार्थी महिलांना पडला आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी पैसे जमा होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, अद्याप प्रत्यक्षात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे हे हप्ते फेब्रुवारीत मिळणार की पुढे ढकलले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, योजनेअंतर्गत सर्व महिलांना हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ पात्र आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली असून शासनाने ठरवलेल्या निकषांमध्ये त्या बसतात, त्यांच्या खात्यातच रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे, घरात चारचाकी वाहन नसणे आदी अटींचा समावेश आहे.

अनेक महिलांनी केवायसी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. मात्र, शासनाने अशा महिलांना चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे.

केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे सादर करून प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित महिलांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

महिला व बालविकास विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील हप्त्यांचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी केवायसी स्थिती तपासून आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. आता शासनाकडून अधिकृत घोषणा कधी होते आणि हप्ते प्रत्यक्षात कधी जमा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News