Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या योजनेचा लाभ गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे. या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्षे वयोगटातील राज्यातील विधवा, परीत्यक्त्या, निराधार, विवाहित महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी,

फेब्रुवारी, मार्च 2025 या कालावधीमधील एकूण नऊ हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत म्हणजेच एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते आत्तापर्यंत 13,500 रुपयांचा लाभ मिळाला आहे आणि लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे. एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार? हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना आता पंधराशे नाहीतर तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे दोघांचे हप्ते सोबतच
खरंतर एप्रिल महिना संपण्यास आता फक्त सहा दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशा चर्चांनी जोर पकडला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित केले होते. फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही, यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आणि अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे.
आता एप्रिल महिना संपण्यास फक्त सहा दिवसांचा काळ शिल्लक आहे आणि यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता, मे महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.
तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे सरकार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे. यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे.
मात्र, आता एप्रिल महिना संपण्यास फक्त सहा दिवसाचा काळ शिल्लक राहिला असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे. असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रत्येकी 1,500 प्रमाणे 3,000 रुपये मिळणार आहेत.