जम्मू-काश्मीर, शिमला, कुल्लू, मनाली सोडा ! कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ थंड हवामानाच्या ठिकाणाला भेट द्या

Maharashtra Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पर्यटकांचे पाय आपसूकच प्रसिद्ध पिकनिक स्पॉटकडे खेचले जातात. यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की राज्यातील अनेक प्रमुख पिकनिक स्पॉटवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते.

यंदाही राज्यातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अनेक पर्यटक जम्मू-काश्मीर, शिमला, कुल्लू, मनाली या ठिकाणी पिकनिकचा प्लॅन बनवत आहे. पण जर तुम्हाला राज्यातच कुठे तरी पिकनिक साठी जायचे असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा 3-4 हॉट फेवरेट डेस्टिनेशनची माहिती सांगणार आहोत जिथे गेल्यावर तुम्हाला जम्मू-काश्मीर, शिमला, कुल्लू, मनाली सारखा फिल येणार आहे.

या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्या

आंबोली : कोकणातील आंबोली हे सुद्धा राज्यातील एक हॉट फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे ठिकाण वसलेले असून या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसते. आंबोली मधील नैसर्गिक सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. येथील डोंगरदऱ्या, जंगल, धबधबे हे खरंच पाहण्यासारखे असून तुम्ही जर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आंबोली हे ठिकाण परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे.

भंडारदरा : आम्ही ज्या पिकनिक स्पॉट बाबत बोलत आहोत त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुद्धा येत. जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या परिसरात हे थंड हवेचे ठिकाण वसलेले असून याला महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

माथेरान : राजधानी मुंबईपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे माथेरान हे सुद्धा एक थंड हवेचे ठिकाण आहे. याही ठिकाणी दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या पिकनिक स्पॉटवर पर्यटक मोठी गर्दी करतात आणि म्हणूनच जर तुम्हालाही कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही माथेरान देखील एक्सप्लोर करू शकता.

गगनबावडा : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हिल स्टेशनवर मोठी गर्दी होते आणि महाराष्ट्रातील गगनबावडा हिल स्टेशन सुद्धा याला अपवाद नाही. राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील हे लोकप्रिय हिल स्टेशन नेहमीच पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय राहिले आहे. त्यामुळे जर तुमचा हे यंदाच्या उन्हाळी हंगामात पिकनिकचा प्लॅन असेल तर गगनबावडा या हिल स्टेशनवर तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी.